आई-वडील आणि शिक्षक ही संस्काराची खाण-बालकवी संतोष नारायणकर

विद्यार्थ्यांनौ संघर्षाची तयारी ठेवा-माजी आयुक्त बळीराम पवार
बीड/परळी-वैजनाथ – प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनौ पावलोपावली संघर्ष आहे संघर्षाची तयारी ठेवा, अपयशाने खचून जाऊ नका सातत्याने संघर्ष करा यश नक्कीच मिळेल असे मार्मिक मार्गदर्शन करत महाराष्ट्र विद्यालय मोहा ही शाळा नसती तर आज बळीराम पवार हे जिल्हाधिकारी न होता ऊसतोड कामगार म्हणून जीवन जगला असता असे शाळेबद्दल गौरव उद्गार माजी आयुक्त बळीराम पवार यांनी केले तर आपले आई-वडील आणि शिक्षक ही संस्कारची खाण असून बालवयात मिळालेले संस्कार हेच पुढील आयुष्यभर आपली ओळख निर्माण करतात असे प्रतिपादन बालकवी संतोष नारायणकर यांनी केले.

परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे संस्थापक संचालक कॉ.बापूसाहेब देशमुख यांच्या 22 व्या स्मृती निमित्य स्मृती व्याखानमाला व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा शुक्रवार दि 19 रोजी महाराष्ट्र विद्यालयात संपन्न झाला.या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून तर संस्थेचे जेष्ठ संचालक सुदाम देशमुख, सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे, मुख्याध्यापक मूरलीधर बोराडे,गणपत कोकाटे, संभाजी देशमुख आदी विचार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, आळशी लोकांचा मराठवाडा अशी राज्यभर असलेली ओळख आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गुणवत्तेच्या आधारे मोडून काढावी.शिक्षण केवळ नौकरी मिळविण्यासाठी न घेता देशाचा एक आदर्श नागरिक बनण्यासाठी घ्यावे.विद्यार्थ्यांनी मनाने आणि शरीराने खंबीर बनत जीवनात सातत्याने संघर्ष करत यश मिळवावे असे सांगितले तर दुसरे प्रमुख अतिथी बालकवी नारायणकर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थाचे मनोरंजन करीत प्रबोधन करण्याचे काम केले. विद्यमान परिस्थितीवर प्रकाश टाकणारी “अशीच एकदा विचारली होती त्यांनी माझी जात…. मी म्हणालो काय सांगू दोन पाय- दोन हात” ही कविता सादर करत मुलांनी या बालवायत आई-वडील आणि शिक्षक यांच्याकडून मिळालेले संस्कार हेच व्यक्तीला पुढील आयुष्याची ओळख देत असतात असे सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव एड अजय बुरांडे ह्यांनी करत संस्था ही केवळ विद्यार्थ्यांसाठी काम करत असल्याचे सांगितले.या प्रसंगी नुकत्याच संपन्न झालेल्या 10 वि, 12 वि बोर्ड परीक्षेतील तसेच राज्य स्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याने छाप निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.या व्याख्यानमालेचे प्रास्तावित मुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, सूत्र संचलन अंगद पेड्डेवाड तर आभार व्यक्त केशव दिक्षित यांनी केले.