🔺कला विषयक अभ्यासक्रम
💠 शासकीय रेखाकला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या दोन्ही चित्रकला परीक्षा २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांनी कळवले आहे..
२०२४-२५ पासून महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचा अधिनियम लागू करण्यात आला त्यानुसार आता शासकीय रेखाकला परीक्षा मंडळाकडून या परीक्षा घेण्यात येणार आहेत. शासनाने शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमास १६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार यंदा ही शासकीय रेखाकला परीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित सर्व केंद्रप्रमुखांनी शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची ऑनलाइन नावनोंदणी , परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरावे, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
🔷 परीक्षेचे वेळापत्रक
🔺एलिमेंटरी चित्रकला परीक्षा २५ सप्टेंबर : वस्तुचित्र १०.३० ते १; स्मरणचित्र २ ते ४ ट्ट २६ सप्टेंबर : संकल्पचित्र १०.३० ते १; कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन : २ ते ४
🔺इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा – २७ सप्टेंबर : स्थिरचित्र १०.३० ते १.३०; स्मरणचित्र : २.३० ते ४.३०.
२८ सप्टेंबर: संकल्पचित्र नक्षीकाम १०.३० ते १.३०; कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन : २.३० ते ५.३०.