भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

🔻सुखद/ पावसाळी पर्यटन-निसर्गाचा आनंद

🔷 भंडारदरा धरणात पाण्याची चांगली आवक

अहिल्यानगर-  अकोले : नाशिक, नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सक्रिय झालेल्या पावसामुळे भंडारदरा धरण पाणलोटात क्षेत्रात, चांगला पाऊस होतो आहे.भंडारदरा धरण सध्या सुमारे ४७ टक्के, तर निळवंडेचा पाणीसाठा २० टक्के झाला आहे.

पाऊस सुरू झाल्याने  पावसाळी पर्यटन ना साठी निसर्ग प्रेमी अकोले, रतनगड, घाटघर, भंडारदरा धरण परिसरात, तसेच हरिश्चंद्रगड, कोकणकडा, या भागात परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. हिरव्या कंच डोंगररांगा आणि अंगावर सळसळत्या पावसाच्या सरी घेत पर्यटक निसर्ग सानिध्याचा आनंद लुटत आहेत तर चांगला पाऊस झाल्याने धरणही येत्या काही दिवसात ओव्हर फ्लो होऊ शकते त्यामुळ परिसरातील शेती आणि धरणाखालील भागातील मिरची पाणी पातळी ही वाढू शकते.