उपचारासाठीअंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयचे अर्थसहाय्य

🔺 क्रीडा-क्रिकेट-खेळाडू

मुंबई :  भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले  माजी क्रिकेटपटू  अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)  आर्थिक मदत जाहीर केली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली.

जुन्या पिढीतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून अंशुमन गायकवाड ओळखले जातात. वर्ष १९७५ ते १९८७ या कालावधीत  भारताकडून ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने गायकवाड खेळले आहेत. तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ही ते राहिले आहेत. लंडनच्या – किंग्स कॉलेज या अत्याधुनिक  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, कर्करोगावरील न उपचार आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे गायकवाड यांना मदत करावी, असे आवाहन भारताचा माजी कर्णधार कपिलदेव, संदीप पाटील यांनी केले होते.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबतची दखल घेत १ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. बीसीसीआय च्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे की सचिन शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आणि त्यानंतर आर्थिक मदतीचा हात पुढे केला. आजाराच्या कठीण समयी किर्केट बोर्ड गायकवाडांच्या कुटुंबासोबत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्यात येईल,