ऑलम्पिक 2024 फ्रान्समध्ये पॅरिस शहरात 100 वर्षानंतर पुन्हा यजमान

🔷 ऑलम्पिक 2024, जागतिक क्रीडा प्रकाराचा महामेळा

🔸सुमारे दीडशे कोटीपेक्षा अधिक चाहते क्रीडास्पर्धा टीव्हीवर पाहतील.

फ्रान्स- पॅरिस- ऑलिंपिक 2024 ची सुरू होण्यासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. 26 जुलै पासून फ्रान्समधील पॅरिस शहरात या स्पर्धा सुरू होत असून ऑलिंपिकचे आयोजन करणाऱ्या लंडन नंतरचे ते दुसरं शहर आहे. यापूर्वीच पॅरिसमध्ये वर्ष 1924 मध्ये ऑलिम्पिक झाले होते, तर लंडनमध्ये 1908, 1948 आणि 2012 मध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. पॅरिसमध्ये शंभर वर्षानंतर उन्हाळी स्पर्धेच्या आयोजन केले गेले जात आहे. यंदाच्या ऑलिम्पिक 2024 ब्रीदवाक्य “गेम्स वाईड ओपन” म्हणजे ‘खेळ तुलनेने मोठा वेगळा व अधिक खुला आहे’

यासाठी आयोजकांनी विशेष तयारी केली असून या सोहळ्याच्या उद्घघाटन समयी सहा ते सात लाख क्रीडाप्रेमी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ऑलम्पिक क्रीडाप्रेमींची संख्या मोठी आहे. दोन लाख 22 हजार मोफत तिकिटे आत्तापर्यंत वाटली गेली आहेत.

🔹ऑलिंपिकची मशाल 68 दिवसात बारा हजार किलोमीटरचा प्रवास करणार -ऑलिंपिक मशाल रिले 16 एप्रिल पासून सुरू झाले होती. ओलंपिया,ग्रीस मध्ये प्रज्वलित झाल्यानंतर ऑलिंपिक ज्योत 26 एप्रिल रोजी अथेन्सला पोहोचली, 9 मे रोजी मार्सेलीला पोहोचली. मोनॅकोमध्ये काही काळ थांबल्या नंतर ऑलम्पिक ज्योतचा फ्रान्स दौरा सुरू झाला. २६ जुलै रोजी उद्घाटन समारंभात ते ऑलम्पिक ज्योत प्रज्वलित करतील. 68 दिवसाच्या प्रवासात ज्योत फ्रान्समध्ये पोहचेपर्यंत सुमारे 12000 किमी चा प्रवास करेल.

🔶 सहभाग 206 देशांचा – दहा हजार पाचशे खेळाडू या ऑलम्पिक मध्ये आयोजित विविध स्पर्धेत सहभागी होत असून यामध्ये 50 टक्के पुरुष आणि 50 टक्के महिला खेळाडू आहेत.
🔻 32 वेगवेगळ्या खेळातील 329 प्रकार खेळले जातील.
🔶 6 वेळा फ्रान्सने ऑलिंपिकचे आयोजन केले आहे. उन्हाळी ऑलिंपिक तीन वेळा तर हिवाळी ऑलिंपिक तीन वेळा झाले.

🔻 स्वयंसेवक 45 हजार – या स्पर्धा यशस्वी आणि उपस्थित क्रीडा प्रेमी, नागरिक, खेळाडू या सर्वांना मदत करण्यासाठी 45000 स्वयंसेवक मदतीला आहेत.

🔶 ऑलम्पिक आणि भारत- ओलंपिक 2024 या क्रीडा स्पर्धेत भारताचे 113 खेळाडू सहभाग घेणार आहेत.  भाग घेणाऱ्यां 133 खेळाडू मध्ये 66 पुरुष तर 47 महिला खेळाडू आहेत. यावर्षी पहिल्यांदाच नेमबाजीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळतील.

🔺 एकूणच ऑलिंपिक 2024 ही स्पर्धा फ्रान्समधील 16 शहरांमध्ये खेळवली जात असून या सर्व स्थळांचे एकूण अंतर 15000 किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पॅरिस सर्वात मोठे ऑलिंपिक असून 16 शहरांमध्ये ही स्पर्धा होत आहे काही ठिकाणी यजमान शहरापासून दहा किलोमीटर ते 700 किलोमीटर अंतरावर आहेत. फ्रेंच पोलीनेशिया ताहितीच्या तेहूपोओ व बीच हे सर्फिंगचे स्थळ जे पॅरिस पासून 15716 किमी व 12 टाईम झोन पासून दूर आहे