राज्यात पाउस सक्रिय काही जिल्ह्यात अलर्ट- मुंबईत मुसळधार पाऊस,

विदर्भात रेड अलर्ट

मुंबई- मागील चार दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात बीड , लातूर आदि भागात कमी अधिक पाऊस पडत आहे.विदर्भ ,मुंबई, पुणे व  कोकण भागात पावसाने जोर धरला आहे. वार्षिक सरासरी एवढा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये झाला आहे. मुंबई आणि परिसरात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, आणि मुंबई, मध्ये इशारा दिला असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबई, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सांगली सातारा  येथील घाटांवर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

अलर्ट जिल्हे – सोमवारी रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा, मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर नाशिक, नंदुरबार, धुळे जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात असून. मराठवाड्यात  छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.  तर हवामान खात्याने व्यक्त  अंदाजानुसार, आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जारी करण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच आसापासच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.