राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार, हवामान विभागाकडून सतर्कतेच्या सूचना, अनेक ठिकाणी सतत धार

 🔹मुसळधार पाऊस , हवामान

पुणे – हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट)  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापणाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असं ही प्रशासनाने कळविले आहे.

पुढील दोन दिवसांत राज्यात पाऊस कायम राहणार आहे. बीड जिल्ह्यात रात्रभर मध्यम सरी चालूच असून सकाळी सात वाजेपर्यंत पाऊस होता. परळी तालुका चांगला पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील भंडारा, चंदपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातही येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात महत्वाचे असलेले पैठण येथील जायकवाडीत येईल त्यामुळे पाण्याची आवक वाढू शकते. गेली दोन दिवस नाशिक जिल्ह्यात पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढते आहे.