मुंबईत मुसळधार पावसाचे थैमानः जागोजागी पाणी तुंबले, धीम्या गतीने लोकल फेऱ्या

पाऊस अपडेट

◾पुण्यात मुठे ला पूर, अनेक रस्ते जलमय, झाडे पडण्याच्या अनेक  घटना. भिंत कोसळून गाड्यांचे नुकसान

मुंबई- पुणे- मुंबई शहर आणि उपनगरांत सुमारे २४ तासापेक्षा अधीक वेळ कमी अधिक प्रमाणात संततधार आहे. पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकण पट्टा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई मध्ये आज पहाटेपासून पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे.

🔷मुंबईचा पाणी प्रश्न मिटला

महानगरी मुंबई शहरास पाणीपुरवठा करण्यात महत्त्वाचे असलेले जल साठ्या पैकी मोडकसागर,तानसा विहार, व तुलसी तलाव भरून वाहण्याची स्थितीत आले आहेत.
…………………………………

गत दोन दिवस पुणे शहर व परिसरात पडत असलेल्या सतंतधर पावसामुळे खडकवासला धरण भरले असून येथून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात सारखा पाऊस सुरू आहे. पुणे शहरातील अनेक भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वाहनांवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.काही भागात कंपाऊंड ची भिंत कॊसळून चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले. इंद्रायणी नदीला ही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. शहरातील इतर नद्यां, नाले भरून वाहत आहेत.