लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव ईटके यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

सामाजिक भान /गरजूना मदत 

बीड/परळी वैजनाथ- भाजपा राष्ट्रीय सचिव, आमदार पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस गरजवंतांना मदत करून साजरा करण्याच्या उपक्रमात भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव ईटके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप करण्यात आला.
गावभागातील श्री वैद्यनाथ विद्यालय येथे शुक्रवार जुलै रोजी, आ. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री वैद्यनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव ईटके यांनी केले होते.
यावेळी बोलताना डॉ शालिनी कराड यांनी पंकजाताई मुंडे या सतत सामाजिक कार्य करीत असणाऱ्या एकमेव राजकीय नेत्या असल्याचे सांगितले. लवकरच वाढदिवसाच्या अनुषंगाने शाळेत मुलींसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबीर घेणार असल्याचे जाहिर केले. युवा मोर्चा प्रदेश सचिव अरुण पाठक यांनी पंकजाताई लवकरच महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील अश्या शुभेच्छा व्यक्त केल्या. भाजपचे अश्विन मोगरकर यांनी आ. पंकजाताई मुंडे विद्यार्थ्यांसाठी द टर्निंग पॉइंट कार्यक्रमात अनेक नामवंत वक्त्यांना बोलावून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम अनेक वर्षे घेतल्याचे सांगितले.

शिवसेनेचे सचिन स्वामी यांनी गावभागतील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या गणवेश वाटप कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी पंकजताईंचा आदर्श घेण्याचे मार्गदर्शन केले.आ. पंकजाताईंना अभिप्रेत असलेला सामाजिक कार्याचा व गरजवंतांना मदत करण्याचा उपक्रम वैद्यनाथ विद्यालयात घेतल्याबद्दल उपमुख्याध्यापक हंगीरगे सर यांनी महादेव ईटके यांचे आभार मानले. उपस्थित सर्वच वक्त्यांनी महादेव ईटके यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुचिता पोखरकर, वैद्यनाथ विद्यालय समन्वयक हरीश देशमुख सर विकास प्रतिष्ठानचे सहसचिव विकास हालगे, मुद्रा लोन समिती सदस्य सुशील हरंगुळे, शिवसेना नेते सचिन स्वामी, माजी नगरसेवक नरेश पिंपळे, योगेश पांडकर शक्ती केंद्रप्रमुख रोहिदास बनसोडे, बूथ प्रमुख राजेश कौलवार, जितेंद्र मस्के, संदीपभैय्या चौडे, शिक्षक राजेश साखरे सर, डाभीकर सर, अजय जोशी सर, गुट्टे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देशमुख मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन संजय देशमुख सर यांनी केले.