पुण्यात नदी काठाच्या मंदिरात पाणी

आपत्ति /पुर 

पुण्यात पुराच्या पाण्यात वाहून आलेला कंटेनर पुलाला धडकला

पुणे – आणि  गत दोन दिवस पुणे शहर व परिसरात पडत असलेल्या सतंतधर पावसामुळे खडकवासला धरण भरले असून येथून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात सारखा पाऊस सुरू आहे. पुणे शहरातील अनेक भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वाहनांवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

कार्पोरेशन जवळील पुलाला पुराच्या पाण्यात वाहून आलेला कंटेनर धडकला. आळंदी येथील नदी पात्र दुथडी भरू वाहत आहे.  सिहगड रोड  भागातील अनेक सोसायटीच्या पार्किंग जागेत पाणी घुसले आहे मोरया गोसावी मंदिर चिंचवड येथे ही पाणी शिरले आहे. डेक्कन जिमखाना भागात तलावाचे स्वरूप आले आहे.