सुवर्णसंधी: बीड जिल्हयासाठी 247 होमगार्डची होणार नियुक्ती

होमगार्ड सेवा

बीड – जिल्हयात होमगार्डमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध असून 247 होमगार्डच्या रिक्त आहेत. अनुशेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन दि. 22 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय बीड येथे केले आहे.

दि. 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahaha/ioginl.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.यासाठी जिल्हयातील स्त्री, पुरुष अर्ज करु शकतात. निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल आणि सक्षम वैद्यकीय अधिका-याचे शारिरिकदृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक इतर अन्य तपशीलाच्या पृष्ठयर्थ सर्व संबधित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

उमेदवारास नोंदणीच्या वेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्यावेळी कोणतिही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.
सदर अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड बीड यांना राहील. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छित असलेल्या बीड जिल्हयातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.

(जि.मा.का.)