प्रकाश अण्णा शेंडगे यांनी परळीतून फुंकले विधानसभेचे रणशिंग

ओबीसी बहुजन पार्टी विधानसभेत किंगमेकरच्या भूमिकेत राहणार – प्रा.टी.पी.मुंडे

◾ मराठवाडा विभागाचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न; ◾ मेळाव्यात ओबीसी बांधवांची लक्षणीय उपस्थिती!

परळी वैजनाथ प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीचे 288 जागेवर उमेदवार उभे करणार असल्याचे रणसिंग परळीतून ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी फुंकले तर विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी ही किंग मेकर च्या भूमिकेमध्ये असेल असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. परळीत आयोजित केलेल्या मराठवाडा विभागाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

परळी येथील श्रद्धा मंगल कार्यालय येथे ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात मराठवाड्यातील आठ ओबीसी बांधवांची तसेच प्रतिनिधींची लक्षणीय उपस्थिती होती. या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. हा मेळावा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात संपन्न झाला. मेळाव्यात सुरुवातीला महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या मेळाव्यात ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी अनेक विषयावर भाष्य केले येणारी विधानसभा ही ओबीसी विरुद्ध मराठा अशी होईल. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आठ ते बारा टक्के एवढा आहे त्या तुलनेने ओबीसी समाज 60 ते 65 टक्के आहे त्यामुळे ओबीसींनी एकत्र येण्याची गरज आहे.

पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सरांनी बोलताना म्हटले की, सरकारकडून ओबीसी आरक्षण संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र ते आपण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली तसेच मराठा समाजाला आपला विरोध नाही गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे परंतु ओबीसी मधून नको अशी परखड मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या हस्ते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच मधुकर तुकाराम मुंडे यांचा ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी कार्यकारणी सदस्य हरिभाऊ मामा शेळके,अँड. मंगेश जी ससाने, रफिक भाई कुरेशी, पांडुरंग मेरगळ, माधव दादा मोराळे, तानाजी भोजने, भीमराव मुंडे, हरिभाऊ गायकवाड, सचिन शेंडगे, अरुणजी जाधवर, सय्यद साहेब, यशवंत अण्णा गायके, भीमराव सातपुते, मंचकराव ढोणे, अर्जुन सलगर, उमेश मोराळे, गोपाळ तांदळे, विलास ताटे, ओमप्रकाश सारडा, आप्पाराव महाराज पांढरे, शंकर नागरगोजे, निळकंठ गडदे, लक्ष्मण वंगे, अफजलभाई, अँड.रवी शिंदे, पडीले साहेब, संभाजी शुळ साहेब, बालाजी शिंगे, सूर्यकांत मुंडे,  प्रदीप भैय्या मुंडे, श्याम गडेकर, छत्रपती कावळे, राहुल कराड, जम्मू सेठ, बबलू सय्यद, इलियास भाई, नवनाथ क्षीरसागर आदीसह ओबीसी बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक गडदे, सूत्रसंचालन प्रा.संदीपान मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विजय मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.