ज्येष्ठ नागरिकांनी तीर्थ दर्शन’साठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

धार्मिक, तीर्थक्षेत्र,

◾ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड– मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने सुरू केलेली  आहे .या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देणे सुलभ होईल. राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीनी २५ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग, नांदेड येथे अर्ज सादर करावे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. यात निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल.