विवेक वर्धिनी विद्यालयाने पटकावले रोप्य पदक

बाल नाट्य स्पर्धा /राज्य हौसी नाट्य स्पर्धा

🔺पूनम ढाकणे हिचा रौप्यपदक देवून सन्मान

परळी वैजनाथ -(एमएनसी न्यूज नेटवर्क) –  सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौसी नाट्य स्पर्धा व २० वि महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २३-२४ मध्ये छत्रपती संभाजी नगर विभागात सादर झालेल्या बीड, संभाजीनगर, नांदेड केंद्रातील पारितोषिक विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया रंग मंदिरात पार पडला.

दरम्यान १४ जानेवारी २४ रोजी यंशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड केंद्रावर सादर केलेल्या श्री. समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ – संचलित विवेकवर्धिनी प्रा. विद्यालय शारदा नगर, परळी-वैजनाथ यांच्या चिऊताई चिऊताई दार उघड ” या बालनाट्यातील” चिमणी “च्या भूमिकेसाठी रौप्यपदक विजेती कु. पून्नम सखाराम ढाकणे हीचा मान्यवरांच्या हस्ते समान कुरून रौप्यपदक बहाल करत सन्मानपत्र व रोख ६ हजार रुपये – गौरव करण्यात आला. सर्वेश श्रीकांत कानेगांवकर याला अभिनय प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले,.छ. संभाजी नगर येशील, जेष्ठ साहित्यीक, जेष्ठ नाटय रंगकर्मी प्रा. दासू वैद्य, रमाकांत मूळे, रवी कुलकर्णी पद्‌मनाभ पाठक आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली, या बालनाट्याचे दिग्दर्शक संतोष चतुर्भुज, लेखक -भाऊ साहेब नारनवळे, नाट्य निर्मितीप्रमूख अरुण सरवदे या जेष्ठ रंगकर्मीचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

था वेळी सह‌भागी विद्यार्थि बाल कलावंत प्रिया कर्जतकर, वैष्णवी विठ्ठल मुंडे, श्रावणी महादेव धसकटे, आर्यन चौधरी, स्वरा राजू जगताप, सार्थक भताने, धनश्री घाढगे, सायली वायबसे, शताक्षी फड, प्रगती कराड, सिध्दी गडेकर,दिवीज मुंडे, सात्वीका गुळभिले, सोहम सिरसाठ, मंयग गरुड, ओमकार दौड,अपूर्व महाजन, इत्यादी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ वेवून संस्थेचे अध्यास, सदाशिव कोळगे साहेब, सचिवः प्रभूआप्पा ईंटके, संचालक- सुभाष अप्पा भिंगोरे, नाट्यरंगकर्मि व संस्थेचे ड्रायरेक्टर एम. टी. मुंडे, प्रभाकर पैजणे, प्रशासकीय अधिकारी माथेकर सर, शाळेचे मुख्याध्यापक- आर. आर. नांदूरकर सर, विद्यावर्धिनी शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर निला सर, संजय कराड, संदीप निला, कदम सर, आदी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, जयती मुंडे मॅडम, वैशाली गडदे मॅडम, साखरे मॅडम इत्यादी शिक्षक-वृंदानी विद्याथ्यर्थ्यांचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या.