परळी मतदार संघातील दादागिरी गुंडगिरी थांबवून जनतेचं राज्य आणण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश – ॲड माधव जाधव

🔶 स्वाभिमानाची लढाई जिंकण्याचा केला निर्धार
बीड…प्रतिनिधी – लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वसामान्यांनी भविष्यात एकत्र येऊन प्रस्थापिताना रोखाव लागेल.परळी मतदार संघतील दादागिरी गुंडगिरी थांबवून जनतेचं राज्य आणणे हि आपली सर्वांची जबाबदारी निर्माण झाली आहे.असे प्रतिपादन ॲड माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेशानंतर केले.आज बीड येथे निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी हजारो कार्कर्त्यांसह ॲड माधव जाधव यांनी जाहीर प्रवेश केला.
बीड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा निष्ठामंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे बीडचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी परळीहून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन ऍड माधव जाधव यांनी आज शक्ती प्रदर्शन केले.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळी मतदार संघातील दादागिरी गुंडगिरी थांबवून जनतेचं राज्य आणयाचे आहे ही आपली सर्वांची जबाबदारी निर्माण झाली आहे.शरद पवार साहेबांच्या मदतीनेच हे शक्य होणार आहे.त्याशिवाय सर्व सामान्यांना न्याय मिळणार नाही.म्हणूनच आपण या पक्षात प्रवेश केल्याचेही जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले.खोट्या केसेस ही तर नित्याचीच बाब झाली आहे,यामध्ये गोरगरीब भरडले जात आहेत.ही लढाई स्वाभिमाची आहे.ती आपल्याला जिंकायचीच आहे यासाठी विधानसभेत तुतारी वाजवण्याची गरज असल्याचे माधव जाधव म्हणाले.