परळीत न.प.च्या अग्निशामक दलाकडे दोन मोटर बाईक

🔺अग्निशमन विभाग/ नागरिकांसाठी आपत्कालीन सुविधा

परळी वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क- महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत बीड जिल्ह्यासातील नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईकचे नगर परिषदचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

परळी नगर परिषदेसाठी आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनासाठी २ दुचाकी सज्ज झाले आहेत. नगर परिषदचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी या दुचाकींचे लोकार्पण केले. अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईक यंत्रासह सज्ज असलेल्या दुचाकीच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

या दुचाकीचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे ‘वॉटरमिस्ट आणि सीएएफ बाइक माउंटेड फायर एक्टिग्विशर’ ही सर्वात आधुनिक आणि कॉम्पॅक्ट फायर कॉम्बॅट सिस्टीम असल्याने महत्त्वाच्या ठिकाणी होणारे मोठे नुकसान टाळता येते आणि आग फार कमी वेळात विझवता येते.या यंत्रणा प्राथमिक स्वरुपाच्या किंवा मध्यम स्वरुपाच्या आगीवर प्रभावीपणे वापरण्यात येतात. या यंत्रणेमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर हा पाण्याच्या सूक्ष्म कणांच्या रुपाने आगीवर केला जातो, जेणेकरुन आगीची उष्णता ही पाण्याचे बाष्पीकरण करण्यासाठी होऊन आग थंड करण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. तसेच पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने आगीच्या सभोवताली असलेल्या प्राणवायुचा पुरवठा कमी होऊन आग विझविण्यास मदत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यंत्रणा एक किंवा दोन व्यक्ती हाताळू शकतात कार्यालये, शाळा इत्यादी सार्वजनिक इमारतीत याचा प्रभावीपणे उपयोग होतो. तेथील कर्मचा-यांना किमान प्रशिक्षण दिल्यास अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत आग काबूत येऊ शकते किंवा विझूही शकते. या यंत्रणेच्या वापरामुळे आगीच्या ठिकाणी पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करणे सहज शक्य आहे. ही ‘बाईक माऊंटेड मिस्ट टेक्नॉलॉजी’ गर्दीच्या भागात प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून ऑपरेशन सुलभ करणारे ठरणार आह. यावेळी मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्याधिकारी संतोष रोडे, लेखापाल सुदाम नरवडे, पंकज दहातोंडे, ज्ञानेश्वर ढवळे, अजय कलंत्री, गुट्टे तसेच नगरपालिकांचे अग्निशमन विभाग प्रमुख सुनिल आदोडे व कर्मचारी मोठ्या संख्येने