उत्तर भारतात अनेक रस्ते बंदः उत्तर प्रदेशात पूरस्थिती,

पुराचे संग्रहित छायाचित्र

🔺हवामान विभागाचा १५ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा.

नवी दिल्ली– उत्तर भारतात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकताच हवामान खात्याने आज सोमवार २९ जुलै साठी हवामानाचा अंदाज दिला असून यात अनेक राज्यात मुसळधार पाऊस होण्याचे अंदाज वर्तविले आहे.यात मुसळधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिला असून अतिवृष्टी होण्याची शक्यता गुजरात, राजस्थान राज्यात दिला आहे.

◾मुसळधार पाऊस चा अंदाज  – महाराष्ट्र,मध्य प्रदेश, गोवा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार अशी आहेत.

दिल्ली आणि शेजारील राज्याला मुसळधार पावसाने झोडपले असून जन जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यावरील वाहतूक पावसामुळे प्रभावित झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी आणि भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता मार्ग वाहतूक प्रभावित झाली आहे.

उत्तर भारतातील काही राज्यात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन त्याचा मोठा परिणाम होत आहे अनेक रस्ते मार्ग या पावसामुळे बंद झाले आहेत, उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये पावसामुळे पूर परस्थिती निर्माण झाली आहे.
राजघाट धरणाचे ८ दरवाजे तर मटाटीला धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे त्याखाली वाहणाऱ्या नद्या आणि उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. स्थानिक प्रशासनाने पूर सदर्ष परिस्थितीमध्ये नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान मध्य प्रदेशातही मुसळधार पाऊस होत असून आहे. राज्यात नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे कोलार, बर्गी, सातपुडा यासह अनेक धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.