यूपीएससी च्या नव्या अध्यक्षा- प्रीती सुदान

🔷 यूपीएससी- केंद्रीय लोकसेवा आयोग

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष मनोज सोनी यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ संपण्यास आणखी काही काळ वेळ होता.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या नव्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान यांनी माजी केंद्रीय आरोग्य सचिव म्हणूनही काम केले आहे. त्या १९८३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

१९८३ च्या बॅचच्या IAS अधिकारी तथा माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची UPSC च्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान गुरुवार १ ऑगस्ट २०२४ रोजी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी महिन्याभरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी यासाठी वैयक्तिक कारणांचा दाखला दिला होता.

प्रीती सुदान २०२२ पासून UPSC च्या सदस्या म्हणून ही कार्यरत असून त्या आंध्र प्रदेश केडरच्या (१९८३) बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी आहेत.