माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन

दुःखद निधनः

🔷 गायकवाड प्रतिभावान खेळाडू होते;पंतप्रधान

नवी दिल्ली- माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचे बुधवारी रात्री वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने ग्रस्त होते. गायकवाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी X वर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

द ग्रेट वॉल’ अशी 
• तत्कालीन संघात अंशुमान गायकवाड व सुनील गावस्कर यांच्यासह सलामीवीर होते. त्यांना सुनील गावस्करांचा ‘राइट हँड’ म्हणत. गायकवाड हे बचावात्मक तंत्राचे फलंदाज होते. त्यांना ‘द ग्रेट वॉल’ असेही म्हणत. गायकवाड यांनी 40 टेस्ट, 15 वनडे खेळले, 2 वर्षे टीम इंडियाचे कोच होते;