🔶 वारे विधान सभेचे
बीड- परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेने ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई येथे गेल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागा लढण्याची घोषणा केली होती, त्यानुसार पक्षाचे निरीक्षक यांनी पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून आपला अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सोपवला होता.
आता त्याच्या पुढच्या टप्प्यात राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे पक्ष निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख व नरेंद्र तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे बीड जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी वैजनाथ तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर व शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली “शिवतीर्थ” जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट येथे परळी वैजनाथ विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ३१ जुलै रोजी प्रदीर्घ बैठक पार पडली.
त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी साठी ईच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी परळीशहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांना आगामी निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी परळी मनसेचा एक आक्रमक चेहरा म्हणून संधी देण्याची पक्ष निरीक्षकांना मागणी करताच तालुक्यातील व शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सैनिकांनी टाळ्या वाजून घोषणा देत अवघा परीसर दुमदुमून गेला व एक मुखाने वैजनाथ कळसकर यांना उमेदवार म्हणून संधी द्यावी अशी मागणी यावेळी मनसैनिकांनी पक्ष निरीक्षकांकडे केली तसेच मनसेचे बीड जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळसह इतर ही ईच्छुक उमेदवारांनी मुलाखती दील्या यावर पक्षीनिरीक्षकांनी सांगीतले की अंतीम निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील व उमेदवार घोषित करतील यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, महेश शिवगण, मनविसे बीड जिल्हाध्यक्ष गणेश काळे, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष हनुमान सातपुते, रुषीकेश बारगजे,विभाग अध्यक्ष माणिक लटींगे, डाॅ.रामलींग घनचेकर, महीला आघाडी ता.उपाध्यक्ष केंद्रे ताई,गणेश राठोड, प्रदीप राठोड, सिद्धार्थ लांडगे,अनंत सोळंके,रोहित हराळ, कोंडींबा कुकर, सुहास विर, धनंजय आव्हाड, गीत्ते मामा, सह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

