युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन

ऑनलाईन व ऑफलाइन नोंदणी

बीड, दि. 01: महसूल पंधरवाडा निमित्त, जिल्हाधिकारी कार्यालय व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरिता बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांकरिता ऑनलाईन व ऑफलाइन नोंदणीचे आयोजन शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी आस्थापना, सहकारी बँक इत्यादी मध्ये सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग घेणे करिता नोंदणी सुरू आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर आस्थापनेच्या आवश्यकतेप्रमाणे निवड झाल्यास बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6000/-, आयटीआय व डिप्लोमा करिता 8000/-, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण बेरोजगारांकरिता 10000/- मानधन/विद्या वेतन पुढील सहा महिने सदर कार्यालयात, आस्थापनेत, कंपनीत, बँक मध्ये पंजाब प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रशिक्षणसह प्रमाणपत्र देण्यात येईल.

येथे होईल ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी-

याकरिता दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड , आयटीआय परिसर चंपावती शाळेच्या मागे नोंदणी करिता 11 ते 05 या वेळेत सर्व कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, श्री सुशील उचले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी Beedskill या फेसबुक पेजला भेट द्यावी.