दू:खद निधन
राष्ट्रीय पातळीवर तीन सुवर्णपदके सुधा मदन यांनी जिंकली होती.
कोल्हापूर : ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक झाल्या होत्या. यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी शुक्रवारी सकाळी मुंबईत वार्धक्यात निधन झाले.
जेष्ठ चित्रकार सावळाराम लक्ष्मण तथा एस. एल. हळदणकर यांच्या शिष्या सुधा मदन यांनी मुंबईत जे. जे. मधून जी. डी. आर्ट व आर्ट मास्टर अस आपल कला शिक्षण पूर्ण केले. जलरंग व तैलरंगात क्लासिकल तसेच इम्प्रेशनिस्ट शैलीत चित्रे ही खासियत असणाऱ्या सुधा मदन यांची देशभरामध्ये अनेक चित्रप्रदर्शने आयोजित झाली होती. राष्ट्रीय पातळीवर तीन सुवर्णपदके तसेच अनेक रौप्यपदके सुधा मदन यांनी जिंकली होती.
द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्य असणाऱ्या सुधा मदन याना दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्ट्स् सोसायटीने सन्मानित केले होते, तसेच २००० साली विजू सडवेलकर पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात मुलगा अजित, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध ऊपळेकर परिवारात जन्मलेल्या सुधा मदन यांचे वडील सराफी व्यवसायात होते. सुधा मदन या चित्रकार अनिल ऊपळेकर व पत्रकार राजा ऊपळेकर यांच्या सख्ख्या चुलत भगिनी होत.