पुण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट;सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस पर्यटकांसाठी बंद

पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे –राज्याच्या अनेक भागात पावसा चे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे अनेक पर्यटक नैसर्गिक स्थळ पर्यटन स्थळांवर पावसाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी गर्दी करत आहेत . मात्र पर्यटकांसाठी महत्वाची एक महत्वाची माहिती आहे. पुण्यातील सिंहगड किल्ला पुढील दोन दिवस पर्यकांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या पुणे जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे सिंहगडावर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असून काळजी घेण्याचे प्रशासनाणे सूचित केले आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून सिंहगड परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने दरडीतील मातीचा चिखल झाला आहे. चिखल काढण्यास वेळ लागत आहे.  शनिवारी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सिंहगड बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यात शनिवारी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हीच बाब लक्षात घेता, सिंहगड आज शनिवार आणि उद्या रविवारी पर्यटनासाठी बंद ठेवला जाईल. त्यामुळे पर्यटकांनी परिसरात फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्तात डोंगराचा मोठा भाग झाडांसह कोसळून पडला होता. त्यामुळे सिंहगडावर जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. सततच्या  पावसामुळे कामात मोठे अडथळे येत आहेत.

शनिवारी कोकणासह राज्यात अनेक विभागात अलर्ट दिल्या असून  घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्रात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मध्ये  जोरदार पावसाची तर  पुणे, साताऱ्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजी, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूरमध्ये ढगांच्या गडगडाट आणि  विजांसह पावसाचा  यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.