श्री गुरुपादेश्वर शिवाचार्या महाराज गिरगावकर यांचे आज पासून अनुष्ठान

🔺धार्मिक

🔺श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

बीड/परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)
पवित्र श्रावणमासानिमित्त श्री गुरुपादेश्वर शिवाचार्या महाराज गिरगावकर यांचे आज पासून प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात अनुष्ठान सुरू होणार असून यानिमित्ताने अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.०४) श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. पुजा,आरती केली.
श्रावणमास निमित्त गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज, गिरगांवकर यांचे ५ ते १७ आँगस्ट दरम्यान श्री.शनी मंदीर देवस्थान, वैद्यनाथ मंदीरच्या पायथ्याशी श्रावणमास तपोनुष्ठान सुरू होणार आहे. श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायम सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण,जलपुनर्भरण,आरोग्य तपासणी शिबीर,सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने रविवारी श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांचे विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पुजा, आरती केली. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री गुरुपादेश्वर महाराजांचे वैद्यनाथाची प्रतिमा, पुष्पहार देवून विश्वस्त राजेश देशमुख, प्रदिप देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी विरशैव लिंगायत समाजाचे समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.