आष्टी तालुक्यातील कडा येथे अन्न व औषध आणि पोलीस प्रशासनाने 13368 किलो भेसळ दुधाची चोरी पकडली

◾पालकमंत्री, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कारवाई

बीड दि.4 (जिमाका) : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील कडा येथे एका गोदामात भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 13368किलो चा साठा धाड टाकून जप्त करण्यात आला आहे. या मालाची किंमत 11 लाख 85 हजार 068 रूपये होती.

ही कारवाई जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात, तसेच छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने राबविण्यात आली. मागील तीन दिवसांपासून याबाबत गोपनीय पद्धतीने मोहीम राबविण्यात आली होती.या अंतर्गत बीड, अहमदनगर आणि धाराशिव येथे आज पहाटे धाड टाकून कार्यवाही करण्यात आली आहे.

बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील साईदत्त एंटरप्राययजेस नावाचे दुकान जवळच पत्र्याचे शेडमध्ये असलेल्या गोदामात भेसळयुक्त दुध तयार करण्यात येत होते. या ठिकाणी दूध तयार करण्यासाठी 13368 किलो भेसळ जप्त झाले. हे काम बऱ्याच दिवसापासून सुरू असल्याचे धाड टाकताना लक्षात आले. ही धाड अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी जिल्हाधिकारी श्री पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी केली. या धाडीमध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अंबादास पांडुरंग चौधरी यांचे हे गोदाम होते.


गोपनिय माहितीच्या आधारे अन्न अन्न व नागरी पुरवठा आणि पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला.
6 लाख 87 हजार 672रुपयांची पोटॅशियम हायड्रॉक्साइड फ्लेक्स, कॉस्टिक पोटॅशियम फ्लेक्स, ट्राय सोडियम सिक्रेट, कॉस्टिक सोडा फ्लेक्स ही भेसळ 6,942 किलो सापडली.
गोदामात अंबादास पांडुरंग चौधरी यांना अनुराधा भोसले यांनी सांगीतले भेसळकारी अन्न पदार्थांचा वापर हा संकलित केलेल्या दुधामध्ये वापर करीत असल्याचे कबुली दिली. संबधित गोदामाला अन्न व औषध प्रशासन श्री देवरे आणि श्री कांबळे यांनी पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली. ही सर्व कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी सं. कृ. कांबळे, विक्रांत हिंगे, सहायक पोलिस निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून ही कार्यवाही केली.
0000