🔶 प्रभू वैद्यनाथासह सर्वच शिवालयात शिवनामाचा गजर◾ शिवमूठ तांदूळ, मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गजबजले.
बीड परळी-वैजनाथ धनंजय आरबुने:- बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्तांनी गर्दी केली होती.बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी पंचक्रोशीतील शिवभक्तांचीपहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. दरम्यान तालुक्यातील सर्वच शिवालये गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. हर हर महादेव… प्रभु वैद्यनाथ महाराज की जय..ओम नम: शिवाय आदी शिवनामाचा जयघोष शिवभक्तांनी केला. यामुळे मंदीर परिसर शिवभक्तांनी दुमदुमून गेला होता. मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
दर्शन सुलभ व्हावे यासाठी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंदिराच्या पायर्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावून महिलांसाठी वेगळ्या रांगांची खास सोय करण्यात आली आहे, बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गजुरात आदी भागांतून भाविक दाखल झाले आहेत. गंगेचे पाणी कावडीने पायी परळीला आणून वैद्यनाथाला अभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांना दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी अडचण होऊ नये म्हणून वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या पाश्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर मार्गावर ओमनिवास शिवायचा सतत जयघोष चालू होता.
🔺मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर भाविकांची गर्दी,
महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने आज बेल-फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणार्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. केवळ बेल-फुलांवर मोठी उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. प्रभू वैद्यनाथ 101 बेलपत्री अर्पण करणाऱ्यांची संख्या मोठी दिसून आली.
🔺नाथ प्रतिष्ठानच्यावतीने भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि राजगिरा लाडू चे वाटप याप्रसंगी करण्यात आले. मंदिरातील आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.
🔺शिवालये गजबजली…
प्रभु वैद्यनाथ व माता पार्वतीच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचे पुराणात अनन्यसाधारण महत्व आहे. परळी पंचक्रोशीतील जिरेवाडीचा सोमेश्वर, टोकवाडीचा रत्नेश्वर, बेलंब्याचे बेलेश्वर, नाथ्राचा पापनाथेश्वर, पिंपळगावाचा पापदंडेश्वर, तपोवनचा महादेव, शेळगावचा भगवान विष्णू, नागापुरचा नागेश्वर, वैजवाडीचा हाकर्यापुकार्या पर्वत या पर्वतावर केदारी महाराजांची समाधी, मांडव्याचा काळभैरव, सारडगावचा केदारेश्वर, धर्मापुरीचा केदारेश्वर, मलिकार्जुन ( मरळसिध्द), घाटनांदुरचा सोमेश्वर या ठिकाणीसुध्दा शिवभक्तांनी दर्शन दर्शनासाठी गर्दी केली होती.यामुळे परिसर गजबजून गेला होता.