🔺मुलींचें शिक्षण
बीड/परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)
मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करुन स्वतःच्या पायावर उभे राहिले तरच समाजात मान सन्मान मिळतो असे प्रतिपादन गर्देवाडीचे सरपंच सुशांत पवार यांनी केले. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेलकम कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाविद्यालयात ११ वीला नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास गर्देवाडीचे सरपंच तथा युवा उद्योजक सुशांत पवार, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ विनोद जगतकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ११ वी व १२ वीच्या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. यामध्ये नेतल शर्मा, कु.मुरकुटे, कु.गायकवाड, कु. कदम तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुशांत पवार म्हणाले की, विद्यार्थिनींनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले पाहिजे.
शिक्षणाने मुलींना समाजात सन्मान मिळतो. मुलगी उच्चशिक्षित व स्वतःच्या पायावर उभी राहिलीतर कुटूंबासह सर्वत्र सन्मान मिळत असतो.अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही, ज्यांना संधी मिळते त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे. तर प्रा डॉ विनोद जगतकर व प्रा प्रसाद देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा फुटके यांनी तर सुत्रसंचालन अंजली धायगुडे, आभार तनूराणी गित्ते हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.विशाल पौळ, प्रा आशिलता शिंदे, प्रा विणा पारेकर, प्रा प्रविण नव्हाडे, प्रा अशोक पवार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.