बीड- परळी वैजनाथ – शक्तीकुंज वसाहत येथील श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संस्थापक संचालक बळवंत बाबुराव सावंत यांची प्राणज्योत काल दि. 06 ऑगस्ट रोजी मावळली ते 83 वर्षाचे होते.
सावंत साहेब म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व केवळ नौकरी करणे ही भूमिका न स्वीकारता समाजाभिमुख कार्य करणे ही त्यांची ओळख. याच्यातुनच त्यांनी १९८७ साली काही सहकार्यांना सोबत घेऊन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाची व स्वामी विवेकानंद वाचनालयाची मूहूर्तमेढ रोवली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून विद्यावर्धिनी विद्यालय, विवेकवर्धिनी विद्यालयाच्या माध्यमातून दिलेले योगदान अनन्य साधारण आहे.
वाचन संस्कृतीची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या माध्यमातून केले आहे.त्यांच्या समर्थ भूमिकेमुळेच वरील सर्व संस्थांचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
सावंत यांना विद्यावर्धिनी विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री कोळगे ,उपाध्यक्ष भिंगोरे , सचिव इटके , संचालक श्री एम.टी. मुंडे ,प्रभाकर पैंजणे , डॉ. भालचंद्र चेवले यांनी आपल्या मनोगतातून अनेक आठवणी सांगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नीला सर, सुमठाणे सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.