‘अष्टावधानी बँकिंग’ ; पुस्तक प्रकाशन

सहकार, बँकिंग, पुस्तक प्रकाशन,

पुणे –दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी सेवा भवन एरंडवणा, पुणे येथे अष्टावधानी बँकिंग या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री अनिल जी कवडे (आयुक्त, महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या प्रमुख हस्ते व मा. श्री दिपकजी तावरे (सहकार आयुक्त,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य). श्री शैलेशजी कोतमिरे (अपर निबंधक, सहकारी संस्था प्रशासन व बँकिंग), मा.श्री श्रीकृष्जी वाडेकर (अपर निबंधक, सहकारी संस्था पतसंस्था) मा. श्री विद्याधरजी अनास्कर (प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई,) मा श्री काकासाहेब कोयटे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) श्री शिरीष जी देशपांडे (मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा अर्बन मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला.

याप्रसंगी रिझर्व बँक ऑफ इंडिया इंडियाचे  माजी अधिकारी,सहकार खात्याचे विद्यमान व माजी अधिकारी तसेच अनेक मान्यवर बँका व पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, संचालिका, अधिकारी व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, मित्र आणि नातेवाईक यांची  उपस्थिती होती.