शालेय साहित्य वाटप
परळी वैजनाथ -प्रतिनिधी. शहरातील वडसावित्री भागात असणाऱ्या नागनाथ निवासी विद्यालयात एक वही एक पेन अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्ताने 14 एप्रिल रोजी पत्रकार विकास वाघमारे व विकास रोडे यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांना अपेक्षित एक वही एक पेन या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत जमा झालेले साहित्य आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी नागनाथ निवासी विद्यालयात वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय खाकरे, संपादक ज्ञानोबा सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, पत्रकार धनंजय आढाव, नवनाथ दाने ,पत्रकार संभाजी मुंडे ,धीरज जंगले, विष्णू मुंडे, हरिभाऊ बुरकुले, इंजिनीयर प्रशांत रोडे, विकास चोपडे, विनायक काळे, विद्याधर शिरसाठ आदी उपस्थित होते. याप्रसंगी रानबा गायकवाड, संजय ठाकरे, अनंत इंगळे, अश्विन मोगरकर, विष्णू मुंडे , नवनाथ दाणे आदींनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रानबा गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन इंगळे सर यांनी तर आभार चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक होळंबे, प्राथमिकचे डी.बी. मुंडे, तसेच शिक्षक संजय फड, अनंत मुंडे, नागरगोजे ,राजभोज, मोती, कराड, धेरे, हरिदास, शिरसाठ मॅडम, व खाडे मॅडम यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते