🔺ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर परिसरात कायमस्वरूपी लोखंडी फाटक बसवा- अँड.मनोज संकाये
◾परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर!
बीड/परळी वैजनाथ प्रतिनिधी-देशातील पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून परळीच्या वैद्यनाथाला ओळखले जाते परंतु याच वैद्यनाथ मंदिर परिसरात नागरिकांचा ट्रॅफिक मुळे श्वास गुदमरतोय अशी खंत येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी व्यक्त करत मंदिर परिसरामध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी करून कायमस्वरूपी फाटक बसवण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन नगरपालिकेची मुख्याधिकारी श्री त्रंबक कांबळे यांना मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आले. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान निवेदन स्वीकारल्यानंतर येत्या दोन दिवसात अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून फाटक बसविण्यासंदर्भात कार्यवाही करू अशी ग्वाही मुख्याधिकारी यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये वाहनांची ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे भाविक भक्तांना तेथे पायी चालता सुद्धा येत नाही त्यामुळे जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या भाविक भक्तांचे गैरसोय होत आहे. अवजड वाहनांना जाण्यासाठी मेरूगिरी पर्वतावरून जाणारा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे परंतु त्या मार्गे ही वाहने न जाता वैद्यनाथ मंदिराच्या समोरील रस्त्यावरून वाहने जातात. गणपती मंदिर तसेच मंदिर परिसरातील बसवेश्वर चौक या ठिकाणी लोखंडी फाटक बसवून त्यावर अवजड वाहनांना प्रवेश निषेध अशी दर्शनी पाठी लावण्यात यावी त्यामुळे भाविक भक्तांचे गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पिसे, अनिल चौधरी, राम जोशी,राहुल कांदे, गिरीश सलगरे, शिवा बडे, काशिनाथ सरवदे, मुंजाभाऊ साठे, अनिल मिसाळ, कैलास रिकिबे, मुंजाभाऊ गरड पत्रकार मोहन चव्हाण, संतोष कांदे, संतोष कांबळे, सुंदर आव्हाड, सुरेंद्र परदेशी, राजीव कसबे, वैजनाथ केंद्रे, आकाश जोगदंड, सदाशिव गोडे, परमेश्वर कसबे, विनोद रोडे, प्रमोद पुरी, वसंत मुंडे, अर्जुन गिरी , अनंत कातकडे, गोविंद कांदे, योगेश मुंडे, गजानन पांचाळ, बालाजी मुंडे ,जयसिंग रोडे आदी उपस्थित होते.
