
◾नवोदय अर्ज
बीड, दि. 8 जिल्ह्याच्या अकरा ब्लॉगसाठी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा 18 जानेवारी 2025 ला होणार आहे. यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील मुला-मुलींना गुणात्मक आणि आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी जवाहर नवोदय विद्यालय समितीची स्थापना करण्यात आली असून या अंतर्गत सामाजिक मूल्य पर्यावरण जागृती शारीरिक शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करून ग्रामीण भागातील हुशार मुलींना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती विचारात न घेता संपूर्ण देशात समान स्तरावर इंग्रजी व हिंदी माध्यमातून शिकविण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या निवासी शाळा आहेत. ज्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय समिती मार्फत चालविल्या जातात.
बीड जिल्ह्यातील अकरा ब्लॉक लसाठी पुढील वर्षाच्या 18 जानेवारी 2025 ला यासाठी प्रवेश परीक्षा होणार असून यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन या परीक्षेत पात्र व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे.
(जि. मा. का.)

