🔺 रेल्वे लोहमार्गाची चाचनी🔺अंमळनेर ते विघनवाडी
बीड : जिल्ह्यातील सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गातील अंमळनेर ते विघनवाडीया मार्गावरून नवीन रेल्वे लोहमार्गाची जलदगती चाचणी शुक्रवारी होणार आहे.
सुरक्षितते साठी आज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत नागरिकांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे. गुरे, पाळीव प्राणी रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच लोहमार्गालगत कोणीही वावरू नये अथवा ओलांडू नये. रेल्वे मार्ग लगतच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी याबाबत गावाच्या सरपंचांनी गावकऱ्यांना कळवावे.
सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्य अभियंता निर्माण, अहमदनगर यांच्याकडून देण्यात आले आहेत

