माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

◾पश्चिम बंगाल🔺देहदान व नेत्रदानाची इच्छा पूर्ण

कोलकाता कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) ज्येष्ठ नेते आणि  पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री व मार्क्सवादी  बुद्धदेव भट्टाचार्य यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मीरा, कन्या सुचेतना असा परिवार आहे.  त्यांची देहदान व नेत्रदानाची इच्छा पूर्ण करण्यात आली.

त्यांचे पार्थिव कोलकाता येथील एनआरएस महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांच्यानंतर बुद्धदेव त्या पदावर २००० साली विराजमान झाले.