सुभद्राबाई गुरुलिंगआप्पा तिळकरी यांचे निधन

दुःखद निधन

परळी वैजनाथ/प्रतिनिधी- येथील सुभद्राबाई गुरूलिंगअप्पा तिळकरी यांचे आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 97 वर्ष वयाच्या होत्या.

वीरशैव लिंगायत समाजाच्या जेष्ठ महिला व पेठ गल्ली येथील रहिवाशी सुभद्राबाई गुरूलिंगअप्पा तिळकरी यांचे आज शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध धार्मीक व सामाजिक कार्यात त्या सक्रीय सहभागी असत. त्यांच्या पश्चात 5 मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा  परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.