लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पत्रकार भवन येथे ११ ऑगस्ट रोजी प्रबोधनसत्र

🔷  प्रबोधन

परळी वैजनाथ/ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवनात ११ ऑगस्ट रोजी प्रबोधन सत्राचे आयोजन केले असून मुख्य वक्ते म्हणून लो.अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक व्याख्याते लक्ष्मण वैराळ हे असणार आहेत.

सविस्तर माहिती अशी कि रविवार दि ११ ऑगस्ट सकाळी ११ वा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कम्युनिष्ठापासून दूर का गेले?, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शोषण मुक्तीची चळवळ पूनरुजीवित करण्यासाठी काय करावे लागेल?, डॉ बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित बुद्ध कि कार्ल मार्क्स या विषयावर होत असलेल्या प्रबोधन सत्राची अध्यक्षता जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड हे भूषविणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता उत्तम पाटोळे, इंजि.शिवाजी होटकर, इंजि.श्रीकांत इंगळे व इंजि. धनंजय शिंदे, गणिततज्ञ एस.एन. निलेवाड, ज्ञानोबा मस्के, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मस्के आदीची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहान स्टुडन्ट फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले – आंबेडकरी अभ्यास समूह आणि परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने भगवान साकसमुद्रे, नितीन ढाकणे, जगदीश शिंदे, अभिमान मस्के, आकाश देवरे, सम्राट गित्ते आदींनी केले आहे.