🔶 यशस्वी परीक्षण🔺 १३० किमी प्रतितास वेग
मुंबई – आपल्या जलद व गतिमान प्रवासासाठी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या वंदे भारत रेल्वे गाडीची 20 बोगी सह अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान वेग चाचणी नुकतीच घेण्यात आली.सद्यस्थितीत मुंबई-अहमदाबाद ही वंदे भारत गाडी १६ बोगी घेऊन धावते आहे.
या चाचणी दरम्यान ही रेल्वे गाडी २० बोगी सह ताशी १३० किमी वेगाने धावण्यात यशस्वी ठरली. संपूर्ण स्वदेशी निर्मिती असलेल्या वंदे भारत साठीच्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) देखरेखीखाली झाली. या चाचणीत वंदे भारत रेल्वे शुक्रवारी सकाळी ७ वाजता अहमदाबादहून निघून दुपारी १२.२१ वाजता म्हणजे ५ तास २१ मिनिटात मुंबई सेंट्रलला पोहोचली. सध्या १६ डब्यांची वंदे भारत ५ तास २५ मिनिटे घेत आहे. बोगीची संख्या वाढल्याने अधिक
४ बोगीचा अधिक भार वाढून ही वंदे भारत गाडीच्या वेगावर परिणाम झाला नसल्याचे चाचणीत स्पष्ट झाले.