🔶 बीड मध्ये डिजिटल ग्रंथालय 🔺डिजिटल ग्रंथालय काळाची गरज.ना.धंनजय मुंडे
बीड , दि. 11 : बीडमध्ये महाराष्ट्र शासन उच्च तंत्र व शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय , बीड यांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता सर्व्हे. नं. ३४ , सहयोगनगर , शासकीय गोदाम , जालना रोड , बीड येथे राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार असून हे ग्रंथालय राज्यातील ४ थे डिजिटल ग्रंथालय म्हणून साकारणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , बीडमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय , बीड याची स्थापना 2005 साली नगर रोड, बीड येथे एका भाडाच्या जागेत झाली. वर्षानुवर्षे या ग्रंथालयामध्ये हजारो संख्येने शालेय विद्यार्थी , एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षाचे तयारी करणारे विद्यार्थी तसेच वकील ,शासकीय अधिकारी, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक सभासद असून ग्रंथालयातील सुविधेंचा उपयोग करीत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हे ग्रंथालय सुरू राहते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेचे वाचनीय साहित्य व सुविधा उपलब्ध करून देते.
एमपीएससी , यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी त्याचबरोबर व्यवसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी यांना अति उत्तम दर्जाचे डिजिटल सुविधा प्राप्त व्हावे यासाठी या जिल्हा ग्रंथपाल अधिकारी,संजय मस्के यांनी जिल्हा प्रशासनाकडे कार्यालयाच्या नवीन स्वातंत्र्य इमारतीसाठी प्रस्ताव दिला होते. संजय मस्के यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे व मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती ,मा अविनाश पाठक साहेब ,यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन स्वातंत्र्य इमारतीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला.
जिल्हा प्रशासनाने या ग्रंथालयाच्या स्वातंत्र्य इमारतीसाठी २० हजार चौ. फूट जागेची संमती दिली असून एवढ्या प्रचंड जागेत १६ हजार चौ. फूट अशी भव्य दोन मजली इमारतीचे बांधकाम होणार आहे .
🔷 ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल सुविधा व इतर सुविधा 🔷
विद्यार्थ्यांसाठी २५ संगणक , मोफत वायफाय , गॅजेट्स , २८ प्रकारची वर्तमानपत्रे , १५० हून जास्त मासिक नियतकालिके , ४५ हजारांहून जास्तीचे पुस्तके, ग्रंथ तसेच कादंबऱ्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ग्रंथालयाचे सभासदांसाठी सुद्धा वर्तमानपत्रे ,मासिक नियतकालिके, ग्रंथ, कादंबऱ्या ,रिसर्च पेपर ,कोर्ट निकाल ,रिसर्च जागतिक माहिती अशा प्रकारे अजून बरेच काही सुविधा उपलब्ध केलेले आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना ग्रंथालयाचे सभासद व्हावे लागेल. हे सभासद पद दोन वर्षासाठी फक्त ६०० रुपयांत होते. तसेच मुले व मुलींच्या सोयीसाठी वेगवेगळे विभाग उपलब्ध आहे, जसे –वर्तमानपत्र विभाग , डिजिटल विभाग , जेष्ठ नागरिक विभाग ,जनरल वाचन कक्ष विभाग , गटचर्चा विभाग , एमपीएससी विभाग , यूपीएससी विभाग या सर्व विभागांचे मुले व मुलींची वेगवेगळे स्वातंत्र्य विभाग आहे. वरील सर्व बाबी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी लागावी व दलित समाजाचा विकास व्हावा हाच ग्रंथालयाचा प्रमुख उद्देश आहे. यामधे
🔷 जिथे गेलो तिथे नवीन स्वातंत्र्य ग्रंथालय इमारती उभारल्या , जिल्हा ग्रंथालय अधिकारी,संजय मस्के
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीड येथील सध्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी या पदावर संजय मस्के हे कार्यरत आहे. संजय मस्के हे धुळे , जालना , घनसांगवी , नंदुरबार , हिंगोली , लातूर येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी या पदावर कार्यरत असताना तिथे ग्रंथालयाच्या स्वातंत्र्य जागा व इमारती बांधण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडुन निधी मिळवून देण्यात सर्वात जास्त मोलाचा वाटा संजय मस्के यांचा आहे.
भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून यांची उपस्थिती–
राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे उद्घाटक म्हणून लाभले आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खा.रजनी पाटील ,आ.पंकजा मुंडे ,खा.बजरंग सोनवणे ,आ. संदीप क्षीरसागर ,आ.प्रकाश सोळंके ,आ.लक्ष्मण पवार , आ.सतीश चव्हाण ,आ.विक्रम काळे , आ.बाळासाहेब आजबे ,आ.नमिता मुंदडा ,मा. अविनाश पाठक,भा.प्र.से. ,अविनाश बारगळ , भा.पो.से.संगीतादेवी पाटील भा.प्र.से.,मा.अशोक गाडेकर , मा.गजानन कोटेवार , डॉ रामेश्वर पवार ,मा.सुनील हुसे , मा.राम मेकले ,मा सुधीर चाटे व ईतर या सर्वांची उपस्थिती लाभनार आहे .