🔺 सुखद🔺सामाजिक बांधिलकी🔺 मदतीचा हात
🔶 समाजाच्या सुखदुःखात कायम पाठीशी राहणारं महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व सावंत सर – अमित भैय्या घाडगे
बीड/परळी-वैजनात – प्रतिनिधी- मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १२ कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजीराव सावंत यांच्या वतीने प्रत्येकी दोन लाखाचे सहकार्य. परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भैया घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.
कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता कर्तव्याच्या भावनेने मराठा भूषण ना.तानाजीराव सावंत सर यांच्या वतीने आजतागायात मराठा समाजाच्या जवळ पास ९० ते १०० कुटुंबांना आर्थिक सहकार्य करत अनेक मुलांना दत्तक घेऊन त्यांच पालकत्व स्वीकारण्यात आलेले आहे. रविवार दिनांक ११ ऑगष्ट २०२४ रोजी परळी वैजनाथ येथे श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भैय्या घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.
यामध्ये चंद्रकांत लक्ष्मण चाळक किनगाव ता. गेवराई, चंद्रकांत अजबराव पतंगे कांडली ता. कळमनुरी, विजय बाबुराव शिरसाट वाकडी ता. भोकरदन, दिगंबर पंढरीनाथ चव्हाण खवणे पिंपरी ता. सेलू, प्रमोद जानकीराम भुजबळ धानोरा ता. लोहा, गणेश पांडुरंग कापसे आपेगाव ता. पैठण, भागवत साहेबराव चव्हाण आहेर वाहेगाव ता. गेवराई, स्वानंद हनुमान मस्के पालवण बीड, भरत राम इंदुरे दगडी शहाजनपुर बीड, दत्ता कालिदास महिपाल शिंदेवाडी ता. माजलगाव या आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबास सहकार्य करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अमित भैय्या घाडगे हे म्हणाले की मराठा समाजाच्या सुखा दुःखात कायम पाठीशी राहणार महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व म्हणजे ना.तानाजीराव सावंत सर आहेत.प्रत्येक कुटुंब हे माझं कुटुंब म्हणून अडचणीला धावणाऱ्या या नेतृत्वास माझा सलाम असल्याच घाडगे म्हणाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव, शिवराज जोगदंड, जगदीश काका फरताडे, अर्जुन काळे, राहुल सुरवसे, अनिल सोळंके, अरुण सपाटे, भागवत साबळे, प्रणित काळे, अक्षय सोनवणे, बबलू मोरे, सुनील काका सोळंके, शिवादास चौधरी, बालाजी भाले, धनंजय कराळे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
