दुसरा श्रावण सोमवार श्री वैद्यनाथ दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.

◾दुसरा श्रावण सोमवार
🔶 रविवारी सुट्टी मुळे हजारो भक्तांनी केली गर्दी.

बीड/परळी-वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क :- देशभरातील बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिरात भाविकांनी रविवारी आलेली सुट्टी आणि सोमवारी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकानीं रविवारी मोठी गर्दी केली. सोमवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यभरातील भाविक तसेच शेजारच्या राज्यातील अनेक भाविकांनी रविवारी रात्री मनोभावे दर्शन घेतले. श्रद्धाळू भाविकांनी मंदिर परिसरात हर हर महादेव, शंभू महाराज की जय असा शिवनामाचा जयघोष करीत होते. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो भाविकांची श्रावणातील दुसऱ्या सोमवार असल्याने मोठी गर्दी होती.

दुसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. लाखों भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले आहे. ‘हर हर महादेव’ चा जयघोष नित्य चालूच होता.दरम्यान मंदिर परिसरात मोठा चौख पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.
…………………………………………………………………………..

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह देशभरातून भाविक दाखल झाले आहेत. शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गजुरात आदी भागांतून भाविक मोठ्या संख्येने येताहेत.
…………………………………………………………………………
मंदिर परिसरातील प्रसाद साहित्याच्या दुकानात बरोबरच देवतांच्या मूर्ती, लहान बालकांच्या खेळण्याचे साहित्याचे दुकान, बेल-फुलांच्या दुकानावर भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती.
…………………………………………………………………………

परिसरातील अनेक मंदिरात भजन विविध सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असून याला ग्रामीण भागातील नागरिकांचा भक्तांचा मोठा प्रतिसाद ही दिसून येत आहे. रत्नेश्वर टोकवाडी, जिरेवाडी येथील सोमेश्वर, संत जगमित्र नागा मंदिर,सूर्वेश्वर मंदिर आदी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून आली.

………………………………………………………………………..

◾ भक्तांसाठी दर्शन पासची ही सोय करण्यात आली होती. दर्शन पास १०० रुपयात होता.

◾ श्रावण महिन्यानिमित्त आणि ज्योतिर्लिंग प्रभू-वैद्यनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या देशभरातील भाविक भक्तां बरोबरच मंदिर सुरक्षा यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे प्रत्येक श्रावण सोमवारी पोलिसांची नजर या व्यवस्थेवर राहणार आहे मंदिर आणि भक्तांच्या सुव्यवस्थेत दर्शनासाठी एक पोलीस उपाधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुमारे 87 पुरुष पोलीस कर्मचारी, 21 महिला पोलीस कर्मचारी, एक दंगल नियंत्रण पथक (सुमारे 40 कर्मचारी)
आणि १०० होमगार्ड असा एकूण बंदोबस्त आहे.

◾ धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी उपवासाच्या फराळा ची खिचडी देण्यात येत असून या सोबतच राजगिरा लाडू, पाणी पाऊच हे देण्यात येत आहे. वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणातील प्रत्येक सोमवारी विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत.

नितीन कुलकर्णी
सचिव ,नाथ प्रतिष्ठान, परळी