🔶 मंदिर परिसरातील फराळ वाटप स्टॉलला दिली भेट;
नाथ प्रतिष्ठाण तर्फे परळीत भाविकांना 5 क्विंटल साबुदाणा खिचडी, दीड टन सफरचंद ,पाणी पाउचचे वितरण
बीड/परळी वैद्यनाथ (दि.12) – राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी आज द्वितीय श्रावण सोमवार निमित्त पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने उभारण्यात आलेल्या फराळ वाटपाच्या स्टॉलला भेट दिली तसेच स्वतः साबुदाणा खिचडी व फळांचे भाविकांना वाटपही केले.
नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण वैद्यनाथ मंदिराची वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, विविध फळे तसेच मिनरल वॉटर चे वाटप धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून केले जाते.
आज श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तब्बल पाच क्विंटल साबुदाण्याची खिचडी तसेच सुमारे दीड टन सफरचंद व तीस हजार मिनरल वॉटर च्या पाऊचचे आज भाविकांना वाटप करण्यात आले, अशी माहिती नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली.
याप्रसंगी ना.धनंजय मुंडे, नितीन मामा कुलकर्णी यांच्यासह रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, जालिंदर नाईकवाडे, रामेश्वर महाराज कोकाटे, रवींद्र परदेशी, अमित केंद्रे, शंकर कापसे, गणेश सुरवसे, माऊली होळंबे, दीपक कुरील यांसह आदी उपस्थित होते.