परळी गंगाखेड मार्ग खोदल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास – अँड.मनोज संकाये

🔶 राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी साहेबांनी संबंधित गुत्तेदारास सूचना द्याव्यात!!

परळी वैजनाथ /प्रतिनिधी- परळी -गंगाखेड मार्ग खोदल्यामुळे नागरिक आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी साहेबांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांमार्फत संबंधित गुत्तेदारांना रोड त्वरित पूर्ण करण्यास सूचित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे.

परळी गंगाखेड मार्गे अनेक प्रवासी प्रवास करतात. काही बस मधून तर काही आपल्या स्वतःच्या वाहनातून प्रवास करतात. दोन्हीही बाजूने हा रोड संबंधित गुत्तेदाराने खोदल्याने वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दोन्हीही बाजूने रोड खोदल्याने रोड मध्ये खड्डे पडले असून याच खड्ड्यात पावसाचे पाणी साचून हे खड्डे भरल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना समजत नसल्याने वाहने घसरून अनेक नागरिक घाण पाण्यामध्ये पडून त्यांना शारीरिक इजा पोहोचत आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे संबंधित गुत्तेदाराने हा रोड त्वरित एका बाजूने पूर्ण करावा तसेच दुसऱ्या बाजूने वाहनधारकांना रोड रिकामा करून द्यावा अशी ही मागणी यांनी केली आहे. याच मार्गे न्यू हायस्कूल भेल सेकंडरी स्कूल या शाळेचे मुले प्रवास करतात त्यामुळे तेथे कसल्याही प्रकारची गतिरोधकाची व्यवस्था नाही. फलक लावलेले नाहीत त्यामुळे हा मार्ग अधिक धोकेदायक होत आहे त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सूचित करून त्यांच्या मार्फत संबंधित गुत्तेदारास सूचना द्याव्यात आणि या रोडचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.