🔷 वैद्यनाथ विद्यालय 1987 🔺मैत्र जिवाचे
परळी वैजनाथ– दि 11ऑगस्ट रोजी रविवार वैद्यनाथ विद्यालय 1987 ग्रुपचा सहावा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त ग्रुपच्या वतीने स्नेह मिलन व कपिलधार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता परळी वैजनाथ बेलवाडी येथून यात्रेची सुरुवात झाली .1987 च्या ग्रुपचे तब्बल 42 जण या स्नेह मिलन कार्यक्रमात उपस्थित होते .
या छोटेखानी यात्रेत कपिलधार येथे मन्मथस्वामी यांच्या समाधीचे दर्शन व स्नेहभोजन झाले.नंतर कपिलधार येथे बऱ्याच मित्रांनीआपले मनोगत व्यक्त केले. आपल्या ग्रुपचे महत्व, सामाजिक कार्य हे सुद्धा बऱ्याच मित्रांनी सांगितले .आपल्या ग्रुपच्या वतीने आपल्या वर्गमित्र जे गरीब, गरजूवंत आहेत. त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नकार्यासाठी मित्रांकडून मोलाचे सहकार्य व मदत झाली. तसे या ग्रुपच्या वतीने वेळोवेळी सामाजिक कार्यक्रम होतात.ग्रुपच्या वतीने वृद्धाश्रमाला भेट ,धार्मिक पर्यटन व सहलीचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमासाठी माझी नगराध्यक्ष श्री दीपक नाना देशमुख, माजी नगरसेवक श्री महादेव आप्पा इटके, शिवसेना नेते रमेश चौंडे ,प्रकाश औटी ,अनिरुद्ध डहाळे ,तानाजी देशमुख ,विकास हालगे, महावीर संघई,नितीन शिंदे, नारायण मुठाळ,कल्याण जाधव ,संदीपान निर्मळ, , राधाकृष्ण वानखेडे, रतन इंगळे, हनुमान इंगळे, रामदास इंगळे, धनंजय स्वामी ,संजय कोरे, गिरीश राघू, मन्मथ कापसे ,राजेश साखरे, विजय शास्त्री ,सुरेश पुजारी, बाबासाहेब सुरवसे ,विष्णू साखरे, सुनील वानरे ,संदीप चौधरी ,बळीराम चव्हाण, रेणुकादास देशमुख, अजय देशमुख ,जगदीश नावंदर, मारुती डहाळे ,भरत मुंडे ,श्रीकांत जोशी, सतीश रेवडकर, मुंजाभाऊ इंगळेउपस्थित होते.तसेच जालण्या हून आवर्जून उपस्थित राहिलेले हैद्राबाद येतुन नंदकिशोर अंधोरीकर जालना येतून श्रीकांत देशमुख व एकनाथ आर्दाड व उस्मानाबादहून सुभाष लोखंडे हेही हजर होते. या संपूर्ण कार्यक्रमाची जिम्मेदारी व नियोजन आपल्या ग्रुपचे अध्यक्ष श्री संतोष पुजारी यांच्याकडे होते. त्यांनी ते काम इमानदारीने व मनःपूर्वक केले. आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अनील बरे नेकणुरकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. अशाप्रकारे 1987 सहावा वर्धापन दिन धुमधडाक्यात ,उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.