तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र 🔶शिवपुत्र 🔶जन्मोत्सव सोहळा
भगवान जिव्हेश्वर यांच्या भव्य शोभा यात्रेने वातावरणात प्रसन्नता

बीड/परळी वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क:- आद्यवस्त्र निर्माता, शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा परळी शहरातील संत जगमित्र नागा मंदिर येथे असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सकाळी सहा वाजता पाळणा आणि आरती होऊन जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. १७ ऑगस्ट २०२४, शनिवारी ,श्रावण शुद्ध १३ रोजी शहरातील संत जनित्र नागा मंदिर येथे जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरातील समस्त स्वकुळ साळी ( विणकर) बांधव येथे पहाटेच आरती साठी सर्व लहान थोर मंडळी उपस्थित होते. समाज बांधवांच्या वतीने सकाळी सहाच्या सुमारास जन्मोत्सव, आणि प्रातसमयी ८ वाजता प्रभू भगवान श्री जिव्हेश्वरांची शोभायात्राही काढण्यात आली. लहान मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा, दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. दहावी -बारावी मध्ये उत्कृष्ट ९०% अधिक गुणसंपादन करणाऱ्या पाल्यांचाही यावेळेस यथोचित गौरव करण्यात आला. दुपारी चार वाजता मुक्ताई महिला भजनी मंडळीचे भजन हे संपन्न झाले. जन्मोत्सव सोहळ्यास शहरातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. माजी नगराध्यक्ष भैया धर्माधिकारी, प्रदीप राव देशमुख (सदस्य वैद्यनाथ देवल कमिटी) यांच्यासह पत्रकारांनी उपस्थिती लावली आणि आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केलं. सायंकाळी ६ वा.आरती होऊन जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली. जन्मोत्सव सोहळ्याचे पौरोहित्य उदय औटी यांनी केलं.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वकुळ साळी विणकर समाजाचे अध्यक्ष बालासाहेब बडकस, सचिव नितीन भंडारे, विलास ताटे, धनंजय आरबुने, नारायण मानकर, नामदेव आरबुने, ज्ञानोबा घटे,भास्कर कौसलें, गंगाधर इंगळे, विष्णू लिखे, अशोक लिखे, विठ्ठल शिवगण, विष्णू शिवगण, भगवान आरबुने, किरण भंडारे, नागनाथ कल्याणकर, श्रीनिवास लटंगे, सुदर्शन वडकर, प्रभू घटे, नवनाथ पोरे,उमेश मानकर, संदीप बोनगे, दौलत आरबुने,लक्ष्मण लिमकर, पवन आरबुने,अशोक आरबुने, दत्तात्रय बडकस,गणेश पोरे, सचिन पोरे, दीपक मानकर, रामकीशन वीर,उमेश मानकर, मयूर आरबुने,किसन कांबळे,दीपक आरबुने, तर महिला मंडळाच्या स्वाती ताटे, मंजुषा पोरे, सुरेखा आरबुने, वैजयंती इंगळे, अनुराधा कौसाले, श्रीमती सीताबाई भंडारे, रंजना जंत्रे, कल्पना ठोंबरे, अरुणा भंडारे, मंजुषा आरबुने ,मीरा घटे, राणी लटींगे, किरण गालम, सुनंदा मानकर, माया बडकस, पद्मा लटेंगे, आरती अरबूने, अंजली पोरे, सारिका आरबुने, पार्वती इंगळे आदीसह स्वकुळ साळी समाजातील तरुणांनी युवतीने कष्ट घेतले.
………………………………………………

◾जन्मोत्सव निमित्त शहरातून भगवान जिव्हेश्वर यांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यात कलशधारी महिला, पताकाधारी तरुण मुलं- मुली ज्येष्ठ नागरिक व टाळकरी मंडळ, भजनी मंडळ, आदींनी सहभाग नोंदवला. शोभायात्रा जगमित्र नागा मंदिर ते नेहरू चौक, देशमुख पार, वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणात थोडासा विसावा आणि त्यानंतर पुन्हा संत जगमित्र नागा मंदिराकडे रवाना झाली.
…………………………………………………

◾संपूर्ण देशभरात श्री भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.विशेषतः महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात,मध्य प्रदेश आदी राज्यातही आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र श्री भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा होतो.
………………………………………………….