आज जागतिक छायाचित्रण दिन;फोटो काढण्याचा मोह कोणास नाही 

🔷 जागतिक छायाचित्रण दिन🔺 प्रत्येकाच्या हाती कॅमेरा कल्पकतेला अधिक वाव

◾ हजार शब्दां च्या लिखानापेक्षा एक छायाचित्र अधिक  बोलके  आणि अधिक परिणामकारक असते, अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. सद्यस्थितीत कॅमेरा प्रत्येकाच्या हाती आला आहे त्यामुळे मिळेल त्या क्षणी मिळेल त्यावेळी छायाचित्र काढली जात असली तरी छायाचित्रांचे महत्त्व अधिकाधिक वाढत आहे.

◾१८३९ मध्ये अश्या प्रकारे छायाचित्रन सुरू झाले.  त्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी लुई डगुएर आणि जोसेफ निसेफोरे निएप्से या दोघांनी शोध लावलेली फोटोग्राफीची पद्धती फ्रान्स सरकारने जाहीर केली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी ‘१९ ऑगस्ट’ रोजी ‘जागतिक छायाचित्रण दिन’ जगभर साजरा केला जातो.

फोटो काढण्याचा मोह कोणास नाही 

सोबतच्या पहिल्या छायाचित्रात पावसाळी खेकडा पाण्यात असून दुसऱ्या छायाचित्रात पोज देण्यासाठी तो पाण्याबाहेर आल्या सारखा दिसत आहे. छायाचित्र टिपले आहे मयूर आरबूने यांनी