मराठवाड्यात आज, उद्या पावसाचा अंदाज

हवामान /पाऊस /मराठवाडा 

संभाजी नगर  : मध्यंतरी एक दोन दिवस कमी झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होतो आहे. नुकत्याच मिळालेल्या  हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत ढगांच्या गडगडाटा सह  पाऊस पडेल, असा अंदाज आहे .

मराठवड्यात १९ ऑगस्ट रोजी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत, २० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा होऊन पाऊस जोरदार पडेल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारेही सुटेल अशी माहिती मिळते आहे.