मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची प्रकृती बिघडली,रुग्णालयात दाखल

मनोरंजन /चित्रपट मल्याळम सिनेमा 

केरळ /कोची : दिग्गज मल्याळम सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांना येथील अमृता वैद्यकीय विज्ञान संस्थेत ताप, श्वास घेण्यास त्रास आणि स्नायूदुखी यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अभिनेते मोहनलाल यांचे (वय ६४) आहे. त्यांचे  निकटवरतीय आणि मल्याळम चित्रपट सृष्टीशी संबंधित श्रीधर पिल्लई यांनी मोहनलाल यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाच्या हवाल्याने माहिती दिली. मोहनलाल ताप, श्वास घेण्यास त्रास होत आहे. मोहनलाल यांना ५ दिवसांच्या विश्रांतीसह औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय निवेदनात म्हटले आहे.

येत्या काही दिवसात मोहनलाल यांचे दिग्दर्शन असलेला बहुप्रतीक्षित “बरोज” हा चित्रपट प्रदर्शित  होणार आहे. या चित्रपटाची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती . दरम्यान  अनेक विलंबांना सामोरे जातहा चित्रपट पूर्णत्वास गेला असून  हा थ्री-डी चित्रपट आहे.