जागतिक छाया चित्रनदिन◾परळी फोटोग्राफर असोसिएशन ने घेतला पुढाकार
परळी –वैजनाथ /प्रतिनिधी -आज 19 ऑगस्ट जागतिक छाया चित्रनदिन जगभरात साजरा केला जातो अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे प्रसंग आपल्या कॅमेरात कैद करून या स्मृती चिरंतन करणारे फोटोग्राफर्स यांच्यासाठी चा आजचा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो.
परळी शहराची एकूणच प्रतिमा धार्मिक तीर्थस्थळ अशी आहे. येथील छायाचित्रकार आपल्या कलेच्या माध्यमातून व्यवसायिक कार्याबरोबरच सार्वजनिक आणि धार्मिक कार्याचे छायाचित्रण करत असतात. आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फोटोग्राफर सुनील फुलारी यांनी मनोगत व्यक्त करताना फोटोग्राफी, त्याचा इतिहास, बदल होत असलेले तांत्रिक उपकरणे याबाबत माहिती देत भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मोदानी,उपाध्यक्ष बाजीराव राठोड, सचिव मोहन तिडके, ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील फुलारी (नाना), हरिभाऊ मोदानी यशवंत चव्हाण, विठ्ठल झिलमेवाड, सोमनाथ वळसे, राजू चव्हाण, गनेश घोडके, हनुमान आगरकर, जयराम गोंडे, राम भाले, सुधीर मोदानी, संजय शिंदे, सोमनाथ सोनटक्के, अजित गौरशेटे, राजाराम तोरडमल, संदीप मोदानी, अनिल उदगीरकर, महेश चव्हाण ,आकाश गीते,आदीं छायाचित्रकार बांधवांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. माणिक भाऊ मुंडे, प्रा. अशोकराव देशमुख, अनंत देशमुख, अमरचंद लोढा, विठ्ठलराव सोळंके, जी टी महाजन सर, निवृत्त पोलीस अधिकारी बलभीम रेपे, फुलचंद गीते, आनंत इंगळे, श्रीकांत पाथरकर, शंकर कापसे, अनिरुद्ध जोशी याबरोबरच इतर सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम गावंडे यांनी केले.