संपादक नितीन ढाकणे, बालासाहेब फड यांना राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्कार

राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्कार

परळी ( प्रतिनिधी) वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या वतीने जगत् विख्यात तत्वज्ञानी थोर समाजसुधारक प्रबोधनकार, राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन, महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२४ जाहिर करण्यात आला आहे. वार रविवार दिनांक 25/8/2024 रोजी गंगा लान्स राष्ट्रसंत भगवानबाबा चौक निर्मल नगर अहमदनगर येथे संपन्न होणार आहे.

वंजारी समाजाच दुसर राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, स्वागताध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू राजकुमार आघाव, तर सह स्वागताध्यक्ष रेणुका वराडे, प्रदेशअध्यक्षक्षा साहित्य आघाडी रेखा शेळके संखे, राजकुमार आघाव राज्य सचिव, प्रा.वा.ना.आधळे खानदेश कवी लेखक मार्गदर्शन, गणेश खाडे विचारवंत साहित्यिक, लेखक आध्यात्मिक मार्गदर्शन तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ सह अनेक मान्यवर उपस्थित सोहळा संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने आपण दैनिक सोमेश्वर साथी चे संपादक बालासाहेब फड परळी वैजनाथ जिल्हा बीड, सह संपादक मोहन आखाडे , दत्ता जाएभाये  किनवट, संपादक ज्ञानेश्वर बुधवंत बुलढाणा, संपादक नितीन ढाकणे परळी वैजनाथ जिल्हा बीड, संपादक निलेश पुराणिक बीड यांनी दैनिकाच्या माध्यमातून करीत असलेली लोकजागृती पहाता आपल्या अदभुत व अलौकिक कार्य बद्दल आपणास जगत विख्यात तत्वज्ञानी थोर समाजसुधारक प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात येणार आहे.