४७७१ फूट उंच टेकडीरील धोडप किल्ला

 🔺सफर किल्ल्याची 🔺दुर्ग भ्रमंती 🔺 निसर्ग पर्यटन 🔶

नाशिक -चांदवड आणि कळवण या नाशिक जिल्ह्यातील तालुक्यात चांदवडच्या वायव्येस १५ मैलांवर अजिंठा अथवा चांदवड टेकड्यांमध्ये ४७७१ फूट उंच टेकडीवर हा किल्ला आहे. याला दोन रस्ते आहेत. एक दक्षिणेकडून चांदवड तालुक्यातून माचीच्या बाजूला व दुसरा उत्तरेच्या कळवण तालुक्याच्या बाजूने पायथ्याशी असलेल्या ओतूर गावातून. ओतूरकडील रस्ता सोपा, पण लांब आहे. मुख्य किल्ला येथून बराच उंचावर आहे. येथे दोन फारशी शिलालेख आहेत. किल्ल्यात किल्लेदाराचा पडका वाडा, एक देवाचे देऊळ, एक टाके, काही खडकात खोदलेली तळघरे व गुहा आहेत. पूर्वेच्या बाजूच्या एका मशिदीत एक देवनागरी शिलालेख आहे.

येथे एक त्रिकोणमिती मोजणीचे स्थान आहे. हा किल्ला अलिवर्दीखान याने स. १६३५ मध्ये मोगलांच्या वतीने जिंकला होता. नंतर तो पेशव्यांकडे आला. मध्यंतरी काही काळ तो होळकरांच्या ताब्यात होता. राघोबादादाचा थोरल्या माधवरावाने येथेच पराभव केला होता.

(संकलित माहिती)